Posts

Showing posts from December, 2024

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२३-२४ ( प्रस्ताव मागणी )

                           जिल्हा क्रीडा  पुरस्कार २०२३-२४  जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे आवाहन   क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे द्वारा दि.  24/01/2020  रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सन २०२ 3-24  या वर्षीच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील  गुणवंत क्रीडापटू (महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडू)  व  गुणवंत क्रीडा मार्गदर्शक  यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व मार्गदर्शनाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांचा व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.  सन 202 3 -२ 4  या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (१ महिला ,  १ पुरुष व १ दिव्यांग खेळाडू) व १ क्रीडा मार्गदर्शक असे एकूण ४ पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार...

जिल्हा युवा महोत्सव - 2 डिसेंबर 2024

Image
मा .  आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आदेशित केल्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी   कार्यालय ,  मुंबई शहर   व नेहरू युवा केंद्र , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने   दिनांक ०२ ,  डिसेंबर २०२४ रोजी     मारवाडी कमर्शियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज , चर्नी रोड , मुंबई येथे   जिल्हास्तर   युवा महोत्सवांचे आयोजन करण्यात   आले   होते.   तसेच   जिल्हास्तर   युवा महोत्सव मध्ये   संकल्पना आधरित स्पर्धा ,  सांस्कृतिक कार्यक्रम  ( यात समुह लोकनृत्य   व   लोकगीत )  कौशल्य विकास कार्यक्रम  ( यात कथालेखन ,  चित्रकला ,  वकृत्व ,  कविता )  विज्ञान व तंत्रज्ञान   - नवसंकल्पना आणि यूथ आयकॉन ) आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या  बाबींचा समावेश होता. सदर युवा महोत्सवांत   प्रमुख पाहुणे श्री. मानखेडकर (माजी उपसंचालक नेहरू युवा केंद्र , मुंबई विभाग) श्री. सुहास व्हनमाने ( जिल्हा क्रीडा अधिकारी   कार्यालय ,  मुंबई शहर ) , श्री. दे...

संविधान दिन पदयात्रा आयोजन - 26 नोव्हेंबर 2024

Image
 दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, संविधान दिन पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. सदर पदयात्रेस  स्थानिक लोकप्रतिनिधी व नवनिर्वाचित  आमदार मा. महेश सावंत (माहिम विधानसभा मतदारसंघ), मा. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा श्री. नवनाथ फरताडे, मुंबई विभाग, सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीड़ा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी श्री. बकरे सर, चैत्यभूमी समिती सदस्य, विविध शाळांतील जवळपास 1260 विद्यार्थी, एनसीसी, स्काऊट गाईड, खेळाडू, विद्यार्थी,  तसेच ज्येष्ठ नागरिक इत्यादी उपस्थित होते. तसेच स्थानिक शिवाजी पार्क पोलिस स्टेशन ची विशेष मदत झाली. सदर पदयात्रा, समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क, महापौर बंगला ते चैत्यभूमी अश्या मार्गाने आयोजित करण्यात होती.जमलेल्या मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुण मानवंदना दिली.त्यानंतर सर्व मान्यवर, उपस्थित विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांनी संविधानाची प्रतिज...