जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२३-२४ ( प्रस्ताव मागणी )
जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२३-२४
जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे आवाहन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे द्वारा दि. 24/01/2020 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सन २०२3-24 या वर्षीच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडू) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व मार्गदर्शनाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांचा व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन 2023-२4 या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (१ महिला, १ पुरुष व १ दिव्यांग खेळाडू) व १ क्रीडा मार्गदर्शक असे एकूण ४ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार पात्रतेचे निकष खालील प्रमाणे आहेत.
(अ) क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार -: (1) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग पंधरा वर्षे संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव असावे. (2) वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. (3) सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकन करिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. (4) गेल्या १० वर्षांत किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरा पर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.
(ब) खेळाडू पुरस्कार -: (1) खेळाडूने पुरस्कार वर्षासह गत पूर्व ५ वर्षांपैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे. (2) खेळाडूंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षांलगत पूर्व ५ वर्षांतील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ/कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्रशासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ट तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.
वरील प्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, सायन (प), धारावी, मुंबई - 17 या कार्यालयातून प्राप्त करून दि. 10 जानेवारी 2025 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सादर करावेत किंवा www.dsomumbaicity.blogspot.com ब्लॉगवरून अर्जाचा नमूना डाउनलोड करून माहिती भरून द्यावी. याबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaicity.blogspot.com यावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी यावर संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.
शासन निर्णय व अर्जाचा नमूना खालीलप्रमाणे जोडला आहे.
Ipl Stamp Price
ReplyDeleteCricket Stump Price In Ipl
Price Of Ipl Stumps
Wicket Price Of Ipl
Ipl Cricket Stump Price
Led Stumps Price In Ipl
Ipl One Stump Price
Price Of Stumps Used In Ipl
One Stump Price In Ipl