संविधान दिन पदयात्रा आयोजन - 26 नोव्हेंबर 2024



 दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, संविधान दिन पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.

सदर पदयात्रेस  स्थानिक लोकप्रतिनिधी व नवनिर्वाचित  आमदार मा. महेश सावंत (माहिम विधानसभा मतदारसंघ), मा. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा श्री. नवनाथ फरताडे, मुंबई विभाग, सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीड़ा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी श्री. बकरे सर, चैत्यभूमी समिती सदस्य, विविध शाळांतील जवळपास 1260 विद्यार्थी, एनसीसी, स्काऊट गाईड, खेळाडू, विद्यार्थी,  तसेच ज्येष्ठ नागरिक इत्यादी उपस्थित होते. तसेच स्थानिक शिवाजी पार्क पोलिस स्टेशन ची विशेष मदत झाली.

सदर पदयात्रा, समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क, महापौर बंगला ते चैत्यभूमी अश्या मार्गाने आयोजित करण्यात होती.जमलेल्या मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुण मानवंदना दिली.त्यानंतर सर्व मान्यवर, उपस्थित विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांनी संविधानाची प्रतिज्ञा वाचन केली. तदनंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

तसेच संविधान दिन पदयात्राचे दैनंदिन वृत्तपत्रात आलेले लेख खाली जोडण्यात आलेले आहेत. 

👉सिंधु रीपोर्टर 

👉 पुढारी 

👉 लक्ष महाराष्ट्र 

Comments

Popular posts from this blog