जिल्हा युवा महोत्सव - 2 डिसेंबर 2024
मा. आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आदेशित केल्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व नेहरू युवा केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२, डिसेंबर २०२४ रोजी मारवाडी कमर्शियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, चर्नी रोड, मुंबई येथे जिल्हास्तर युवा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच जिल्हास्तर युवा महोत्सव मध्ये संकल्पना आधरित स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम (यात समुह लोकनृत्य व लोकगीत) कौशल्य विकास कार्यक्रम (यात कथालेखन, चित्रकला, वकृत्व, कविता) विज्ञान व तंत्रज्ञान - नवसंकल्पना आणि यूथ आयकॉन) आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या बाबींचा समावेश होता.
सदर युवा महोत्सवांत प्रमुख
पाहुणे श्री. मानखेडकर (माजी उपसंचालक नेहरू युवा केंद्र, मुंबई
विभाग) श्री. सुहास व्हनमाने (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर), श्री.
देवेंद्रसिंहजी अध्यक्ष (मारवाडी कमर्शियल हायस्कूल व जूनियर कॉलेज), श्रीमती कुसुम पाठक (मुख्याध्यापिका, मारवाडी
कमर्शियल हायस्कूल व जूनियर कॉलेज), श्रीमती कणिका (नेहरू
युवा केंद्र प्रतिनिधी, मुंबई ) यांच्या उपस्थिती मध्ये
यशस्वीरित्या कार्यक्रम संपन्न झाला. आयोजित करण्यात येणाऱ्या
स्पर्धात्मक बाबी त्याकरिता आवश्यक असलेले नियम, सहभाग कलाकार संख्या, कला सादरीकरणाकरिता आवश्यक
असलेला वेळ व विजयी कलाकारांना ट्रॉफी, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
.
👉 पुढारी
Comments
Post a Comment