राज्य क्रीडा दिन १५ जानेवारी २०२५

 


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर आयोजित राज्य क्रीडा दिन उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला. धारावी येथील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे किक बॉक्सिंग, क्रिकेट, लंगडी आणि बास्केटबॉल या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 स्पर्धेचे उद्घाटन शारीरिक शिक्षण शिक्षक प्रमुख श्री.डॉ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांना कुस्तीचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री नामदेव बडरे आणि रंगराव हरणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेतांना पत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच लेखक प्रा.संजय दुधाने यांचे लिखित ऑलिंपिक वीर खाशाबा या पुस्तकाचे खेळाडूंना वाटप करण्यात आले. यावेळी अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू क्रीडाशिक्षक आणि संघटना प्रतिनिधींनी आपली हजेरी लावली.
 राज्य क्रीडा दिनाचे हे आयोजन क्रीडा प्रेमींना प्रेरणा देणारे ठरले असून युवा पिढीमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी आत्मविश्वास निर्माण करण्यास उपयुक्त ठरले. 
तसेच राज्य क्रीडा दिनाचे दैनंदिन वृतापत्रात आलेले लेख खाली जोडण्यात आले आहे . 







Comments

Post a Comment

Popular posts from this blog