Posts

Showing posts from March, 2013

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत खेळाडूंना दिल्या जाणार्याा प्रवास सवलतीबाबत.....

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत खेळाडूंना शासकीय  क्रीडा स्पर्धांमध्ये व शैक्षणिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास सवलत देण्यात येते. सदरील प्रवास सवलतीबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या www.msrtc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ सर्व खेळाडूंनी घेण्यासाठी आपण वरील वेबसाईट अवश्य पहावी. 

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१२-१३

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१२-१३ करीता अर्ज पाठविणे बाबत.....   महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २००२ पासून जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्‍या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता यांचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहेत त्याकरीता जिल्ह्यातील सर्व जिल्हा व राज्यसंघटनांमार्फत गुणवंत खेळाडू,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. नवीन शासननिर्णायानुसार पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रुपये १००००/- देऊन गौरविण्यात येईल. हे पुरस्कार फक्त मुंबई शहर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खेळाडू, मार्गदर्शक व कार्यकर्ता यांनाच दिले जातील. सदरचे पुरस्कार १ मे या महाराष्ट्र दिनी वितरीत करण्यात येणार आहेत. सदर पुरस्काराबाबत अर्जाचा विहित नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे विनामुल्य प्राप्त होतील. तसेच पुरस्कार नियमावलीत झालेले बदल www.mahasportal.gov.in या संकेतस्थळावर १ ऑक्टोबर,२०१२ च्या शासननिर्णयात ‘ शिवछत्रपती राज्य   क्रीडा जीवन गौरव पुरस्कार , उ...
एन.आय.एस.पतिय़ाळा प्रमाणपत्र अभ्यासक्रमा बाबत.           राज्यातील उदयोन्मूख खेळाडुंना त्यांचे क्रीडा कौशल्य व क्रीडागुण विकसीत करण्याची संधी उपलब्ध करुन देतायावी या अनुषंगाने केंद्र शासनाच्या नेताजी सुभाष नॅशनल इंन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्टस, पतियाळा , या संस्थे मार्फत विविध खेळाचे ६ आठवड्याचे अभ्यासक्रम  राबविण्यात येतात.           या अभ्यासक्रमाचा लाभ १२ वी पास असणारे खेळाडु तसेच विविध शालेय संस्थेत, महाविद्यालये, येथील क्रीडा शिक्षक घेऊ शकतात . या अभ्यासक्रमाचे आयोजन दिनांक १७  मे ते २६ जून २०१३ या  कालावधित पतियाळा (पंजाब), कोलकाता, गुंटुर (आंध्र प्रदेश), गांधिनगर (गुजरात), तसेच भारतातील एकुण १० राज्यात होत असुन सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छीत व्यक्तींनी प्रवेश अर्जा बाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर,मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला, जि.पी.ओ.समोर, बोरीबंदर, मुंबई -०१ दुरध्वनी क्र. ०२२/२२७०२३७३ येथे किंवा मो.क्र.९७३०२००६५६, येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा...