जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१२-१३

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१२-१३ करीता अर्ज पाठविणे बाबत.....
 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २००२ पासून जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्‍या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता यांचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहेत त्याकरीता जिल्ह्यातील सर्व जिल्हा व राज्यसंघटनांमार्फत गुणवंत खेळाडू,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. नवीन शासननिर्णायानुसार पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रुपये १००००/- देऊन गौरविण्यात येईल. हे पुरस्कार फक्त मुंबई शहर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खेळाडू, मार्गदर्शक व कार्यकर्ता यांनाच दिले जातील. सदरचे पुरस्कार १ मे या महाराष्ट्र दिनी वितरीत करण्यात येणार आहेत. सदर पुरस्काराबाबत अर्जाचा विहित नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे विनामुल्य प्राप्त होतील. तसेच पुरस्कार नियमावलीत झालेले बदल www.mahasportal.gov.in या संकेतस्थळावर १ ऑक्टोबर,२०१२ च्या शासननिर्णयात ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य  क्रीडा पुरस्कार (खेळाडू/संघटक-कार्यकर्ता), राज्य  क्रीडा साहसी पुरस्कार,एकलव्य राज्य  क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू), जिजामाता राज्य  क्रीडा पुरस्कार  जिल्हा क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीस मान्यता देण्याबाबत.. ’ या शिर्षकांतर्गत पहावयास मिळतील.
तरी उपरोक्त पुरस्कारासाठीचे अर्ज  आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रांसह दि.२५ मार्च २०१३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, मल्होत्रा हाऊस, ३रा मजला, जी.पी.ओ. समोर, बोरीबंदर, मुंबई-०१ (दूरध्वनी क्रमांक- २२७०२३७३) येथे सादर करावेत असे आवाहन श्रीमती स्नेहल साळुंखे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी केलेले आहे .

Comments

Popular posts from this blog