भारतीय खेळ प्राधिकरणमार्फत अथलेटिक्स व व्हॉलीबॉल या खेळांची निवडचाचणी
भारतीय खेळ प्राधिकरणाने ’महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई एच.ओ.सी.एल.इंटरनॅशनल स्कूल, रसायनी’ ही शाळा खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी दत्तक घेतले आहे. १३ ते १८ वर्षे वयोगटातील जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदकविजेत्या खेळाडूंनी निवडचाचणीकरीता दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०१३ रोजी पिल्लई एच.ओ.सी.एल.इंटरनॅशनल स्कूल स्पोर्टस ग्राउंड, रसायनी येथे सकाळी ८.३० वाजता उपस्थित रहावे. निवडचाचणीकरीता येताना खेळाची मूळ प्राविण्य प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट साईज छायाचित्रे, साक्षांकित निवासाचा दाखला तसेच मूळ जन्म दाखला सोबत घेऊन यावे. निवड झालेल्या खेळाडूंना महात्मा एज्युकेशन सोसायटीतर्फॆ मोफत शिक्षण, वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच साई तर्फे खेळाचे प्रशिक्षण व खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना मासिक भत्ता, विविध स्पर्धांमध्ये सहभाग तसेच विमाही उतरविला जाणार आहे. मुंबई शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय - २२७०२३७३ कि...