शिवछत्रपती पुरस्कार सन २०११-१२


राज्य शासनामार्फत स २०११-१२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कॄष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू, संघटक/ कार्यकर्ते) राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा  पुरस्कार (अपंग खेळाडू) जिजामता राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शासननिर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.शिछ्पु.२०११/प्र.क्र.१९८/२०११/क्रीयुसे-२,दिनांक १ ऑक्टोबर,२०१२ अन्वये पुरस्काराचे अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या www.mahasportal.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सुधारीत नियमावलीतील तरतुदी विचारात घेऊन संबंधित मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनांनी त्यांची शिफारस, आवश्यक ती कागदपत्रे व संघटनेच्या ठरावासह पात्र इच्छुकांचे अर्ज दि. १५ मार्च २०१३ पर्यंत आयुक्त,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे-१ या पत्त्यावर मागविण्यात येत आहे.

उपरोक्त पुरस्कारासाठी आवश्यक त्या माहितीसह वैयक्तिकरित्या विहित नमुन्यात अर्ज करता येईल. तसेच हे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, मल्होत्रा हाऊस, ३ रा मजला, जी.पी.ओ.समोर, बोरीबंदर, मुंबई-०१ या पत्त्यावरदेखील उपलब्ध करून मिळतील. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

Important Notice Regarding Subroto Football Cup 2025 – Online Primary Form Submission Only