युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजना बाबत.. सन २०१२ – १३.
महाराष्ट्र
शासन
जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय,मुंबई शहर
मल्होत्रा
हाऊस,तिसरा मजला,जि.पी.ओ.समोर,बोरीबंदर,मुंबई-०१
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(तात्काळ) जा.क्र/जिक्रीअ/युवक
क.अनु.यो/तृटीपु. /२०१२.
दिनांक :- ३१/०१/२०१२
प्रति,
मा.सचिव/अध्यक्ष
--------------------------------
--------------------------------
--------------------------------
विषय
;- युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजना बाबत.. सन २०१२ – १३.
संदर्भ
:- १) मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे दि. ३०/१/२०१३ चे पत्र.
महोदय,
उपरोक्त विषयानुषंगे केरळ स्टेट युथ वेल्फेअर बोर्ड केरळ
राज्य यांचे संयुक्त विद्यमाने तिरुअनंतपुरम येथे दि.१० ते १४ एप्रिल २०१३ या
कालावधित राश्ट्रीय एकात्मता शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर शिबीर १५ ते ४० या वयोगटातील युवक च युवती करिता असल्या
कारणाने मुंबई शहरातुन एक युवक व एक युवती अशा दोन व्यक्तींची निवड करण्यात येणार
आहे. या शिबीरात विविध धार्मीक, सांस्कृतीक व सामाजीक बाबींचा समावेश असुन सहभागी
व्यक्तींना या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबीरा करीता केरळ येथे जाण्याचा
खर्च केरळ राज्या तर्फे करण्यात येणार असुन शिबीरा करीता नांवे नोंदविण्याची अंतीम
तारीख दिनांक १०/२/२०१३ आहे.
तरी इच्छूक व्यक्तींनी आपली नांवे आपल्या अर्जासह जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला,जि.पी.ओ.समोर,बोरीबंदर,मुंबई-१येथे स्वत: उपस्थित राहून नोंदवावयाची आहेत. अधिक माहिती करीता श्री.उदय पवार,
क्रीडा अधिकारी, मो.क्र.९७३०२००६५६ यांना संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती स्नेहल
साळुंखे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी केलेले आहे.
आपली विश्वासू.
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई शहर.
प्रत माहितीस्तव.
मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य,पुणे.
मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग, मुंबई. १
Comments
Post a Comment