निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन सन २०१२-१३


निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन सन २०१२-१३
     महाराष्ट्र शासनाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे-१ व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे संयुक्त विद्यमाने युवक कल्याण विषयक विविध उपक्रमात जास्तीत जास्त युवक व युवती यांना सहभागी करून त्यांच्या सुप्त गुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील १५ ते ३५ वर्ष वयोगटातील युवक युवतींसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
    या स्पर्धा दि.१७ जानेवारी २०१३ रोजी आयोजित केल्या जाणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात असणार्‍या कार्यक्षेत्रात शिकणारे, वास्तव्य करणारे युवक-युवती यात भाग घेऊ शकतील. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या  युवक-युवतींना खालीलप्रमाणे रोख पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात येतील.
                  क्रमांक                                 रोख पारितोषिक
                  प्रथम                                   रु. ५००
                 द्वितीय                            रु. ३००
                  तृतीय                              रु. १००
     निबंधाकरीता २००० ते २५०० शब्दांची मर्यादा राहील. निबंध स्पर्धेकरीता वेळ एक तास व वक्तृत्व स्पर्धेकरीता दहा मिनिटे दिली जातील. विषय ऐनवेळी चिठ्ठी टाकून दिला जाईल.
ज्या युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले प्रवेश अर्ज दि. १५ जाने.२०१३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर,मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला, जि.पी.ओ.समोर, बोरीबंदर, मुंबई -०१. या पत्त्यावर पाठवाव्यात किंवा या संदर्भात अधिक माहितीसाठी श्रीमती सुचिता ढमाले, क्रीडा अधिकारी (मो.क्र. ९००४१३९५५७) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती स्नेहल साळुंखे यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog