जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन २०१३-१४
वृत्तपत्रीय टिप्पणी
जिल्हास्तरीय
युवा महोत्सव आयोजन २०१३-१४
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागा मार्फ़त व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे
वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचे निश्चित झाले असुन सदर युवा महोत्सव कार्यक्रमात फ़क्त १५ ते ३५
वयोगटातील युवा व युवती भाग घेऊ शकतील. सदर युवा महोत्सवात पुढील बाबींचा समावेश
राहील. लोकनृत्य , लोकगीत, तबला, हार्मोनियम, सितार, गिटार, मृदंग, बासरी,
भरतनाटयम, वक्तृत्व, शास्त्रीय गायन,इ.या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना राज्यस्तरीय
युवा महोत्सवामध्ये सहभागी होता येईल.राज्यस्तरावर सहभागी स्पर्धकांचा खर्च
शासनामार्फ़त करण्यात येईल तसेच विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक दिले
जातील.दिनांक १ते ४ डिसेंबर २०१३ या कालावधित घेण्याचा मानस असुन
ज्या कलाकारांना युवा महोत्सवामध्ये भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपल्या
प्रवेशिका दिनांक ३०/११/२०१३ पुर्वी जिल्हा क्रीडा संकुल कार्यालय, धारावी सायन-
बांद्रा लिंक रोड धारावी बस टेपो आगारा,धारावी १७ येथे पाठवावी.माहितीसाठी दुरध्वनक्र.९७०२८६११७१ येथे संपर्क साधावा.
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई शहर
Comments
Post a Comment