जि्ल्हास्तर शालेय स्पर्धांच्या प्रवेशिकेबाबत...

बुद्धीबळ, ज्युदो स्पर्धेच्या प्रवेशिका दि. २३ ऑगस्ट २०१३ पर्यंत कार्यालयात जमा करण्यात याव्यात.

टेबल टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या प्रवेशिका दि. २७ ऑगस्ट २०१३ पर्यंत कार्यालयात जमा करण्यात याव्यात.

व्हॉलीबॉल, धनुर्विद्या, बॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट, रायफल शूटींग, स्केटिंग, रोलर हॉकी स्पर्धेच्या प्रवेशिका दि. १ सप्टेंबर  २०१३ पर्यंत कार्यालयात जमा करण्यात याव्यात.

टीप: विहीत मुदतीत वरील खेळांच्या प्रवेशिका कार्यालयात जमा कराव्यात. प्रवेशिकेशिवाय खेळाडूला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची  कृपया नोंद घ्यावी. प्रवेशिकेत सर्व माहिती तसेच संलग्नता पावती क्रमांक व प्रवेश फी पावती क्रमांक याची नोंद करावी. अर्धवट माहिती भरलेल्या प्रवेशिका तसेच मुख्याध्यापकांची सही व शाळेचा शिक्का नसल्यास प्रवेशिका ग्राह्य समजण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

Comments

Popular posts from this blog