Posts

Showing posts from May, 2013

केंद्र शासना मार्फ़त युवक पौगंडावस्थेतील मुलांच्या विकासा करिता (NPYAD) राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे बाबत..२०१३-१४

केंद्र शासना मार्फ़त युवक पौगंडावस्थेतील मुलांच्या विकासा करिता ( NPYAD) राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे बाबत .. २०१३-१४ ------------------------------------------------------------------------              युवक व पौगंडावस्थेतील मुलांच्या विकासा करिता राष्ट्रीय कार्यक्रम ( NPYAD) राबविणे बाबत. संयुक्त सचिव,भारत सरकार,युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, नवी दिल्ली यांचे परिपत्रक दिनांक २६ एप्रिल २०१३ अन्वये सुचना दिल्या नुसार सन २०१३-१४ या वर्षामध्ये युवक व पौगंडावस्थेतील मुलांच्या विकासा करिता राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहुन परिपुर्ण प्रस्ताव दिनांक २० मे २०१३ पर्यंत सादर करावयाचे आहेत.            याबाबत मुंबई जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रातील कार्य करणार्‍या नोंदणी कृत संस्थानी आपले प्रस्ताव दिनांक १९ मे २०१३ पर्यंत जिल्ह्या क्रीडा अधिकारी कार्यालय,मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला,जि.पी.ओ...

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१२-१३ करीता अर्ज पाठविणे बाबत.....

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१२-१३ करीता अर्ज पाठविणे बाबत.....   महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २००२ पासून जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्‍या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता/संघटक यांचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहेत त्याकरीता जिल्ह्यातील सर्व जिल्हा व राज्यसंघटनांमार्फत गुणवंत खेळाडू,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु अत्यंत कमी अर्ज प्राप्त झाल्याने १८ मे २०१३पर्यंत मुदतवाढ देऊन पुहा अर्ज मागविण्याचा निर्णय जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीने घेतला आहे. गेल्यावर्षीपर्यंत पुरस्कारार्थिंना रु.२१००/- रोख पारितोषिक दिले जात होते. नवीन शासननिर्णायानुसार पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करून पुरस्कारार्थींना रोख रुपये १००००/- तसेच प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. हे पुरस्कार फक्त मुंबई शहर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खेळाडू, मार्गदर्शक व कार्यकर्ता यांनाच दिले जातील. सदर पुरस्काराबाबत अर्जाचा विहित नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथ...