Tuesday, 26 February 2013

भारतीय खेळ प्राधिकरणमार्फत अथलेटिक्स व व्हॉलीबॉल या खेळांची निवडचाचणी


भारतीय खेळ प्राधिकरणाने ’महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई एच.ओ.सी.एल.इंटरनॅशनल स्कूल, रसायनी’ ही शाळा खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी दत्तक घेतले आहे.
१३ ते १८ वर्षे वयोगटातील जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदकविजेत्या खेळाडूंनी निवडचाचणीकरीता दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०१३ रोजी पिल्लई एच.ओ.सी.एल.इंटरनॅशनल स्कूल स्पोर्टस ग्राउंड, रसायनी येथे सकाळी ८.३० वाजता उपस्थित रहावे.
निवडचाचणीकरीता येताना खेळाची मूळ प्राविण्य प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट साईज छायाचित्रे, साक्षांकित निवासाचा दाखला तसेच मूळ जन्म दाखला सोबत घेऊन यावे.
निवड झालेल्या खेळाडूंना महात्मा एज्युकेशन सोसायटीतर्फॆ मोफत शिक्षण, वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच  साई तर्फे खेळाचे प्रशिक्षण व खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना मासिक भत्ता, विविध स्पर्धांमध्ये सहभाग तसेच विमाही उतरविला जाणार आहे. मुंबई शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय - २२७०२३७३ किंवा एच.ओ.सी.एल. इंटरनॅशनल स्कूल - ९५२१९२-२५२१९२, २५२१९५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Monday, 18 February 2013

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, अर्जुन पुरस्कार सन २०१३


दरवर्षी  केंद्रशासनामार्फत विविध खेळातील अत्युच्च कामगिरी केलेल्या खेळाडूंना विविध पुरस्कारांनी गौरविले जाते. या वर्षीदेखील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य  पुरस्कार, ध्यानचंद  पुरस्कार, अर्जुन पुरस्कार इ. पुरस्कारांकरीता केंद्रशासनामार्फत अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

सन २०१३ या वर्षाकरीता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य  पुरस्कार, ध्यानचंद  पुरस्कार, अर्जुन पुरस्कार इ. पुरस्कारांकरीता भरावयाच्या अर्जाचा नमुना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर, मल्होत्रा हाऊस, तिसरा मजला, जी.पी.ओ.समोर, बोरीबंदर, मुंबई -०१ येथे उपलब्ध होतील.

सदर पुरस्काराकरीता प्राप्त प्रस्ताव छाननी करून दि. २७ फेब्रुवारी २०१३ पर्यंत   शासनास सादर करावयाचे आहेत. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. 

शिवछत्रपती पुरस्कार सन २०११-१२


राज्य शासनामार्फत स २०११-१२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कॄष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू, संघटक/ कार्यकर्ते) राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा  पुरस्कार (अपंग खेळाडू) जिजामता राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शासननिर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.शिछ्पु.२०११/प्र.क्र.१९८/२०११/क्रीयुसे-२,दिनांक १ ऑक्टोबर,२०१२ अन्वये पुरस्काराचे अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या www.mahasportal.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सुधारीत नियमावलीतील तरतुदी विचारात घेऊन संबंधित मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनांनी त्यांची शिफारस, आवश्यक ती कागदपत्रे व संघटनेच्या ठरावासह पात्र इच्छुकांचे अर्ज दि. १५ मार्च २०१३ पर्यंत आयुक्त,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे-१ या पत्त्यावर मागविण्यात येत आहे.

उपरोक्त पुरस्कारासाठी आवश्यक त्या माहितीसह वैयक्तिकरित्या विहित नमुन्यात अर्ज करता येईल. तसेच हे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, मल्होत्रा हाऊस, ३ रा मजला, जी.पी.ओ.समोर, बोरीबंदर, मुंबई-०१ या पत्त्यावरदेखील उपलब्ध करून मिळतील. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

Saturday, 16 February 2013

सुर्यनमस्कार योग कार्यक्रम


  सुर्यनमस्कार योग कार्यशाळा सुरु करण्याबाबत......
औरंगाबाबत येथील क्रीडा भारती या संस्थेने लाखो विदयार्थ्यांचा सामुदायिक सुर्यनमस्काराचा कार्यक्रम दिनांक १८ फ़ेब्र्रुवारी २०१३ ( जागतिक सुर्यनमस्कार दिन) रोजी संपुर्ण राज्यभर आयोजित केला जात आहे. दिनांक १२ जानेवारी २०१३ (स्वामी विवेकानंद जयंती) ते  दिनांक  १८ फ़ेब्र्रुवारी २०१३ या कालावधीत संपुर्ण  राज्यभर सुर्यनमस्कार विषयक प्रशिक्षण कार्यशाळा व विविध स्तरीय स्पर्धा आयोजन होत आहे. करिता आपण आपल्या शाळेत सुर्यनमस्कार योग कार्यशाळा घेउन आपला अहवाल जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय, मुबंई शहर मल्होत्रा हाउस  तिसरा मजला येथे पाठवावे असे आव्हाण श्रीमती स्नेहल साळुंखे यानी केले आहे.तसेच  विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असुन त्या कार्यक्रमात सहभाग व्हावे.
)दिनांक १८/०२/२०१३ रोजी शिवाजी पार्क, दादर
)दिनांक १७/०२/२०१३  लालबाग ,भालचंद्र मैदान, परेळ
                                       आपली विश्वासु

                                                जिल्हा क्रीडा अधिकारी
                                                     मुंबई शहर

Friday, 1 February 2013

जिल्हा क्रीडा संकुल, धारावी. सन २०१२-१३ सभा आयोजना बाबत


महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला, जि.पी.ओ.समोर,बोरीबंदर,मुंबई-०१
दुरध्वनी क्र. ०२२/२२७०२३७३         Email-ID-dsomumbai@rediffmail.com
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सभा आयोजन
क्र.जिक्रीअ/सभा.आयो./२०१२-१३
दिनांक : २९ जानेवारी, २०१३.
प्रति,
मा. मुख्याध्यापक/ अध्यक्ष / सचिव
------------------------------------
------------------------------------

विषय : जिल्हा क्रीडा संकुल, धारावी. सन २०१२-१३
सभा आयोजना  बाबत
महोदय/ महोदया,
            उपरोक्त विषयानुरुप मुंबई शहरात शासनाचे अदयावत क्रीडा संकुल असावे तसेच त्यांत खेळाडुंना प्रशिक्षणा कारिता उत्कृष्ठ सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, तर्फे धारावी येथे अदयावत क्रीडा संकुल पुर्णत्वास येत आहे .
मुंबई शहरातील खेळाडु, विविध शैक्षणीक संस्था तसेच एकविध खेळ जिल्हा संघटना यांना जिल्हा क्रीडा संकुलाचा लाभ व्हावा या करिता, मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई, यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहरातील शाळेचे मुख्याध्यापक , महाविद्यालयाचे प्राचार्य, यांची सभा दि.६/२/२०१३, रोजी जिल्हा क्रीडा संकुल,एच ब्लॉक, धारावी येथे होत आहे. मुंबई शहराच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीने सदर सभेचे आयोजन होत असल्या कारणाने आपली उपस्थिती अत्यंत महत्वाची तसेच मार्गदर्शक ठरणार आहे. तरी खाली दिलेल्या वेळेनुसार सभेस उपस्थित रहावे ही विनंती आहे.
सभेचे वेळापत्रक

अ.क्र.
सभा उपस्थित
सभेची वेळ
स्थळ
मुंबई शहरातील  सर्व माध्यमिक व प्राथमीक शाळांचे मा. मुख्याध्यापक,
दुपारी १२.०० ते १.००
जिल्हा क्रीडा संकुल, सभागृह, एच ब्लॉक, धारावी
मुंबई शहरातील  सर्व महाविद्यालयांचे मा. प्राचार्य, मुंबई शहर
दुपारी १.०० ते २.००

 आपली विश्वासू

  (स्नेहल साळुंखे)
जिल्हा क्रीडा अधिकारी,  मुंबई शहर
प्रत माहितीस्तव
 मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई,



महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला, जि.पी.ओ.समोर,बोरीबंदर,मुंबई-०१
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सभा आयोजन,                                                                           जा.क्र.जिक्रीअ/जि.क्री.सं./सभा-२०१३
दि.२९/१/२०१३
प्रति,
मा. मुख्याध्यापक/ अध्यक्ष / सचिव
------------------------------------

विषय : जिल्हा क्रीडा संकुल, धारावी. सन २०१२-१३
सभा आयोजना  बाबत
महोदय/ महोदया,
            उपरोक्त विषयानुरुप मुंबई शहरात शासनाचे अदयावत क्रीडा संकुल असावे तसेच त्यांत खेळाडुंना प्रशिक्षणा कारिता उत्कृष्ठ सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, तर्फे धारावी येथे अदयावत क्रीडा संकुल पुर्णत्वास येत आहे .
मुंबई शहरातील एकविध खेळ जिल्हा संघटना यांना जिल्हा क्रीडा संकुलाचा लाभ व्हावा या करिता, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई, यांच्या अध्यक्षते खाली मुंबई शहरातील एकविध खेळ जिल्हा संघटनांचे पदाधिकारी यांची सभा दि.५/२/२०१३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल,एच ब्लॉक, धारावी येथे होत आहे.
मुंबई शहराच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीने सदर सभेचे आयोजन होत असल्या कारणाने आपली उपस्थिती अत्यंत महत्वाची तसेच मार्गदर्शक ठरणार आहे. तरी खाली दिलेल्या वेळेनुसार व खेळ निहाय सभेस उपस्थित रहावे ही विनंती आहे.
सभेचे वेळापत्रक

अ.क्र.
एकविध जिल्हा क्रीडा संघटनांचे नांव
सभेची वेळ
स्थळ

फुटबॉल,हॉकी, अ‍ॅथेलॅटीक, थ्रोबॉल, कबड्डी, खोखो. व्हॉलीबॉल,हॅण्डबॉल. सॉफ्ट्बॉल.
सकाळी ११.३० ते
दुपारी १२.३०
जिल्हा क्रीडा संकुल, सभागृह, एच ब्लॉक, धारावी
बॅडमिंटन, टेबल टेनीस, जिम्नॅस्टीक,कॅरम, बुध्दीबळ, बॉक्सिंग,कुस्ती.ज्यूदो. तायक्वांडो.फेन्सिंग, सिकई मा. आर्ट, स्क्वॅश,वेट-लिफ्टींग, पॉवर लिफ्टींग,
दुपारी. १२.३० ते दुपारी.१.३०
जलतरण,ट्ग ऑफ वॉर, बेसबॉल, बास्केटबॉल, मल्लखंब, आर्चरी,लॉन टेनीस
दुपारी. १.३० ते दुपारी.२.३०
विविध संस्था व सेवाभावी मंडळ.
दुपारी.२.३० ते दुपारी.३.३०

  आपली विश्वासू

  (स्नेहल साळुंखे)
जिल्हा क्रीडा अधिकारी,  मुंबई शहर
प्रत माहितीस्तव
 मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई,