जिल्हा क्रीडा पुरस्कार २०११-१२


जिल्हा क्रीडा पुरस्कार २०११-१२ करीता अर्ज पाठविणेबाबत.....
 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २००२ पासून जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्‍या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता यांचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहेत त्याकरीता जिल्ह्यातील सर्व जिल्हा व राज्यसंघटनांमार्फत गुणवंत खेळाडू,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रुपये २१००/- देऊन गौरविण्यात येईल. हे पुरस्कार फक्त मुंबई शहर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खेळाडू, मार्गदर्शक व कार्यकर्ता यांनाच दिले जातील. सदरचे पुरस्कार १ मे या महाराष्ट्र दिनी वितरीत करण्यात येणार आहेत. सदर पुरस्काराबाबत अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे विनामुल्य प्राप्त होतील.
तरी उपरोक्त पुरस्कारासाठीचे अर्ज आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रांसह दि.८ एप्रिल २०१२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, मल्होत्रा हाऊस, ३रा मजला, जी.पी.ओ. समोर, बोरीबंदर, मुंबई-०१ (दूरध्वनी क्रमांक- २२७०२३७३) येथे सादर करावेत. विहीत मुदतीनंतर येणार्‍या अर्जाचा विचार पुरस्कारासाठी केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीकरीता श्रीमती सुचीता ढमाले (क्रीडा अधिकारी.) मो.क्र. ९००४१३९५५७ यांचेशी  संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती स्नेहल साळुंखे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर,(जिल्हा) यांनी केलेले आहे .

No comments:

Post a Comment