Monday, 9 July 2012

शालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रम आयोजनाबाबत क्रीडा शिक्षकांची बैठक सन २०१२-१३.


बैठकीची सूचना
शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजन,२०१२-१३.
बैठक : दि१६/०७/२०१२ सकाळी ११.३० वा.
स्थळ : शारदाश्रम विद्या मंदीर, दादर, मुंबई.

क्र.शाक्रीस्प/आयोजन/२०१२-१३/का-२.
दिनांक :


प्रति,
मा.अध्यक्ष / सचिव,
प्राचार्य / प्राचार्या, मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका.
__________________________________
__________________________________
विषय: शालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रम आयोजनाबाबत
क्रीडा शिक्षकांची बैठक सन २०१२-१३.
बैठक: दिनांक १६/०७/२०१२ सकाळी ११.३० वा.
स्थळ: शारदाश्रम विद्या मंदीर, दादर, मुंबई.
महोदय/महोदया,
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तथा जिल्हा क्रिडा परिषद मुंबई शहर मार्फत सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात विविध खेळांच्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्याकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक/शिक्षिकांची बैठक दि. १६/०७/२०१२  रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता शारदाश्रम विद्या मंदीर, दादर, मुंबई येथे आयोजीत केलेली आहे. सदरहू बैठकीस आपल्या अधिपत्या खालील शारीरिक शिक्षण शिक्षक/शिक्षिका यांना बैठकीस वेळेवर उपस्थित राहणे बाबत आपल्या स्तरावरुन सूचित करण्यात यावे.
तसेच सन २०१२-१३ यावर्षाची जिल्हा क्रीडा परिषद संलग्नता फी शूल्क रु. १०००/- (एक हजार फक्त) जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहर (District Sports Council, Mumbai City) या नावे धनाकर्ष/धनादेशाद्वारे शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्या सोबत पाठविण्यात यावे. रोख रक्कम स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

स्पर्धांचे प्रवेश शुल्क प्राथमिक प्रवेशिकेत ( ) खुण केल्यानुसार सर्व खेळांची व बाबींची गणना करुन एकदाच धनाकर्ष / धनादेशा व्दारे दि. ८ ऑगस्ट. २०१२ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते दु. १.०० व दु. २ ते दु.४.०० या वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मल्होत्रा हाऊस, तिसरा मजला, जी.पी.ओ.समोर, बोरीबंदर, मुंबई येथे स्विकारली जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.
        राष्ट्रीय शालेय १७ वर्ष वयोगट मुले / मुली फुटबॉल स्पर्धाचे आयोजन यावर्षी लवकर असल्या कारणाने जिल्हास्तर शालेय १७ वर्ष वयोगट फुटबॉल मुले / मुली स्पर्धा दिनांक २६ जुलै २०१२ पासून आयोजित करण्यात येणार आहेत. १७ वर्ष वयोगट मुले / मुली खेळाच्या प्रवेशिका परिपुर्ण भरुन दि. २३ जुलै. २०१२ पर्यंत या कार्यालयात पाठवीण्यात याव्यात दि. २३ जुलै. २०१२ नंतर येणा-या प्रवेशिका अपात्र समजण्यात येऊन, त्या संघांना स्पर्धेत प्रवेश नाकारला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.
          गत वर्षात आपल्या संस्थेकडुन सर्व शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन तथा नियोजना करिता अनमोल असे मार्गदर्शन तसेच सहकार्य प्राप्त झाल्याने सर्व शालेय स्पर्धांचे आयोजन यशस्वीरित्या पार पडलेले आहे, याबद्दल जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहरच्या वतीने आपले आभार व्यक्त करते. याही वर्षी असेच सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. सन २०१२-१३ या वर्षाच्या शालेय व इतर क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व वातावरण मिळवून देण्याचा व त्यांची कारकीर्द पुढे उज्ज्वल करण्यासाठी आपण मिळून चांगले प्रयत्न करुन मुंबई शहराचे नांव उज्ज्वल होईल, अशी कामगिरी करावी, अशी नम्र विनंती आहे.
तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी आपण पत्रावर नमूद केलेल्या इ-मेल आय.डी.वर कोणत्याही अडचणी संदर्भात संपर्क केल्यास त्याचे उत्तर आपणांस ताबडतोब देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच आपले इ-मेल आय.डी. देखील या कार्यालयास देण्याची व्यवस्था करावी.
          “आपल्या सहकार्या बाबत मनःपूर्वक धन्यवाद
स्पर्धे बाबत अधिक माहिती करिता ;- www.dsomumbaicity.blogspot.com पहा
आपली विश्वासू

                                                                                                               
                                                                              (स्नेहल साळुंखे)
                                                                         जिल्हा क्रीडा अधिकारी,                            
                                                                                  मुंबई शहर.

No comments:

Post a Comment