जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन
जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे
आयोजन
क्रीडा
व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीच्या
प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचेद्वारा दि. २२ व
२३ फेब्रुवारी, २०१७ रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर,
सायन-वांद्रे लिंक रस्ता, सायन (प.) येथे ८ ते १४ वर्षे वयोगटातील
विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरावरील क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन केले आहे.
तरी सर्व प्राथमिक व
माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या शाळेतील ८ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या
वजन, ऊंची, ३० मी. धावणे, लवचिकता, खडी लांब उडी ह्या पाच प्रकारात १२ गुण
मिळविणा-या खेळाडूंची नांवे दि. १७ फेब्रुवारी,,२०१७ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, मुंबई शहर येथे प्रत्यक्ष अथवा dsomumbaicity@gmail.com या मेल
वर पाठवावीत.
Comments
Post a Comment