जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सन २०१६-१७



जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सन २०१६-१७

          शासन निर्णय क्र.राक्रीधो-२०१२/प्र.क्र.२५०/१२/क्रीयुसे-२ मुंबई दिनांक २८/०४/२०१४ अन्वये राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून मुंबई शहर जिल्ह्यात क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्याबाबत खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळामधील कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना करुन देणे आवश्यक आहे. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी या पार्श्वभुमीवर क्रीडा शिक्षकांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा, शासन अनुदानित व विनाअनुदानित शाळा यातील क्रीडा शिक्षक शिबीरासाठी पात्र असतील.
          या प्रशिक्षणाद्वारे विविध वयोगटातील खेळाडू घडविणे व खेळाडूंच्य कामगिरीत प्राविण्य निर्माण करण्याच्या दृष्टीने क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व त्या दृष्टीने जिल्ह्यांतील क्रीडा शिक्षकांची क्रीडा विषयक उजळणी करुन दरवर्षी होणारे नियमातील बदल त्यांच्या निदर्शनास आणून त्याची माहिती अवगत करुन देण्यात येईल. या शिबीरार्थींना तज्ञ क्रीडा प्रशिक्षक किंवा संघटनेचे तांत्रिक पदाधिकारी तसेच आहार तज्ञ, शरीर विज्ञान तज्ञ, क्रीडा मानसोपचार तज्ञ तसेच मास्टर ट्रेनर कडून मार्गदर्शन केले जाईल.
          सदर शिबीर दि. २२ ते ३० जून, २०१६ (२६ जून वगळून) या कालावधीत भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, सायन वांद्रे लिंक रस्ता, मुंबई शहर येथे आयोजित करण्यांत येणार आहे. तरी, इच्छुक क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळाप्रमुखांमार्फत त्वरीत जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई शहर येथे संपर्क साधावा. प्रथम ८० क्रीडा शिक्षकांनाच याचा लाभ घेता येईल याची नोंद घ्यावी.


                                                                              जिल्हा क्रीडा अधिकारी,
                                                                                     मुंबई शहर

Comments

Popular posts from this blog