मुंबईतील क्लब/जिमखाने यांचा क्रीडा सुविधेमध्ये सहभागबाबत.....
महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर
२ रा
मजला, जिल्हा क्रीडा संकूल इमारत, सायन-बांद्रा लिंक रोड धारावी,सायन(प) ,
मुंबई४०००१७
दुरध्वनी क्रमांक - ६५५३२३७३ Email : dsoff.mumbaicity@dsys.maharashtra.gov.in
---------------------------------------------------------------------------------------------------
जा.क्र/जिक्रीअमुंश/मैदान/न.क्र.१०३/२०१४/का-५/
दिनांक –
प्रति,
-------------------
-------------------
--------------
विषय – मुंबईतील क्लब/जिमखाने यांचा क्रीडा सुविधेमध्ये
सहभाग.
संदर्भ
–मा.विभागीय उपसंचालक (क्रीडा)पत्र क्र.बैठक-२०१३/प्रक्र.२४८/क्रीयुसे-१
दिनांक
-१३/०२/२०१४ चे पत्र
मा. महोदय/महोदया,
आपणास कळविण्यास मला अतंत्य आनंद होत आहे की,मुंबईतील
क्लब/जिमखाने यांच्या सचिव सोबत तात्कालीन मा.अप्पर मुख्य सचिव ,शालेय शिक्षण व
क्रीडा विभाग यांच्या अधक्षतेखाली दिनांक २६/०९/२०१३ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत
क्लब / जिमखाने मधील उपल्ब्ध क्रीडा सुविधांचा वापर फ़क्त सभासदांपुरताच मर्यादीत न
ठेवता कल्ब / जिमखाने यानी खेळाला उत्तेजन देणे आवश्यक असुन त्यासाठी जागतिक
दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन तसेच क्लब / जिमखान्यामध्ये उपलब्ध असलेल्या
क्रीडा सुविधा उदयोन्मुख खेळाडु तसेच त्या परिसरातील शाळेमधील विदयार्ध्यांना
नाममात्र दराने उपलब्ध करुन देण्यात याव्यात या बाबत चर्चा करण्यात आलेली आहे.
मुंबईतील कल्ब / जिमखान्यामधील उपलब्ध
क्रीडा सुविधांची यादी व सदर क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्याचा कालावधी व आकारणी
करण्यात येणा-या शुल्लकाबाबतची माहिती मा. विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा,
मुंबई विभाग,मुंबई यांनी संबंधीत कल्ब /जिमखाने यांना पाठविण्याबाबत सुचित केलेले
असुन सदर माहिती लवकरच प्राप्त होईल.
तथापि नरिमन रोड ,चर्चगेट येथील क्रीकेट कल्ब
ऑफ़ इंडिया मिमिटेड यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या स्कॅवश,बॅडमिंटंन , क्रीकेट
क्रीडा सुविधा उदयोन्मुख खेळाडुंना नि:शुल्लक उपलब्ध करुन दिल्या जातील असे
कळविलेले आहे.
तेव्हा आपण आपल्या शाळेतील/महाविदयालयातील
उदयोन्मुख खेळाडुंना क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्याविषयी कार्यवाही करावी अशी
आपणास विनंती आहे
आपली विश्वासु
(स्नेहल साळुंखे)
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई शहर
Comments
Post a Comment