शालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रम आयोजनाबाबत क्रीडा शिक्षकांची बैठक सन २०१३-१४.
बैठकीची सूचना
शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजन,२०१३-१४.
बैठक : दि २० जूलै २०१३, सकाळी १२.०० वा.
स्थळ : जिल्हा क्रीडा संकूल, ऒ.एन.जी.सी. बिल्डींग मागे,
धारावी, मुंबई.
|
क्र.शाक्रीस्प/आयोजन/२०१३-१४/का-२.
दिनांक : ३ जूलै,२०१३
|
प्रति,
मा.अध्यक्ष / सचिव,
प्राचार्य / प्राचार्या, मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका.
__________________________________
__________________________________
विषय: शालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रम आयोजनाबाबत
क्रीडा शिक्षकांची बैठक सन २०१३-१४.
बैठक : दिनांक २० जूलै २०१३, सकाळी १२.०० वा.
स्थळ : जिल्हा क्रीडा संकूल, ऒ.एन.जी.सी. बिल्डींग मागे, धारावी, मुंबई.
महोदय/महोदया,
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तथा जिल्हा क्रिडा परिषद मुंबई शहर मार्फत सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात विविध खेळांच्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्याकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक/शिक्षिकांची बैठक दिनांक २० जूलै २०१३,रोजी सकाळी ठीक १२.०० वाजता जिल्हा क्रीडा संकूल, ऒ.एन.जी.सी. बिल्डींग मागे, धारावी, मुंबई. येथे आयोजीत केलेली आहे. सदरहू बैठकीस आपल्या अधिपत्या खालील शारीरिक शिक्षण शिक्षक/शिक्षिका यांना बैठकीस वेळेवर उपस्थित राहणे बाबत आपल्या स्तरावरुन सूचित करण्यात यावे.
सन २०१३-१४ यावर्षाची जिल्हा क्रीडा परिषद संलग्नता फी शूल्क गत वर्षा प्रमाणे रु. १०००/- (एक हजार फक्त) राहील, खेळ नियाह स्पर्धा शूल्क, गतवर्षा प्रमाणेच ठेवण्यात आलेले आहे. सर्व शाळांनी जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहर (District Sports Council, Mumbai City) या नावे धनाकर्ष/धनादेशाद्वारे शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्या सोबत प्राथमिक प्रवेशीकेसह पाठवावे. रोख रक्कम स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
//२//
स्पर्धांचे प्रवेश शुल्क प्राथमिक प्रवेशिकेत (√ ) खुण केल्यानुसार सर्व खेळांची व बाबींची गणना करुन एकदाच धनाकर्ष / धनादेशा व्दारे दि. ८ ऑगस्ट २०१३ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते दु. १.०० व दु. २ ते दु.४.०० या वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे स्विकारली जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.
सर्व खेळांच्या प्रवेशीका तसेच सर्व वयोगट मुले / मुली खेळाच्या प्रवेशिका परिपुर्ण भरुन दि. ८ ऑगस्ट २०१३ पर्यंत या कार्यालयात पाठवीण्यात याव्यात, त्यानंतर येणा-या प्रवेशिका अपात्र समजण्यात येऊन, त्या संघांना स्पर्धेत प्रवेश नाकारला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.
गत वर्षात आपल्या संस्थेकडुन सर्व शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन तथा नियोजना करिता अनमोल असे मार्गदर्शन तसेच सहकार्य प्राप्त झाल्याने सर्व शालेय स्पर्धांचे आयोजन यशस्वीरित्या पार पडलेले आहे, याबद्दल जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहरच्या वतीने आपले आभार व्यक्त करते. याही वर्षी असेच सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. सन २०१३-१४ या वर्षाच्या शालेय व इतर क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व वातावरण मिळवून देण्याचा व त्यांची कारकीर्द पुढे उज्ज्वल करण्यासाठी आपण मिळून चांगले प्रयत्न करुन मुंबई शहराचे नांव उज्ज्वल होईल, अशी कामगिरी करावी, अशी नम्र विनंती आहे.
“आपल्या सहकार्या बाबत मनःपूर्वक धन्यवाद”
स्पर्धे बाबत अधिक माहिती करिता ;- www.dsomumbaicity.blogspot.com पहा
आपली विश्वासू
(स्नेहल साळुंखे)
जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई शहर.
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई जिल्हा.
२. मा. संचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मा उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई.
४. मा उपसंचालक, शालेय शिक्षण, मुंबई विभाग, मुंबई.
५. मा. शिक्षण निरीक्षक पूर्व/दक्षिण विभाग, बृह्न्मुंबई.
कृपया आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळा व क.महाविद्यालयांना आपल्या स्तरावरुन सूचित करावे, अशी विनंती आहे.
Comments
Post a Comment