युवा महोत्सव

युवा महोत्सव
युवकांच्या विविध कलागुणांना वाव देऊन, त्यांच्यातील सूप्त कलागुणांचा विकास करण्याची योजना युवा महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाते.
राष्ट्रीयस्तरावर आयोजित होणार्‍या युवा महोत्सवात महाराष्ट्राचा संघ उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. सन २०११-१२ या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन लवकरच करण्यात येत आहे. या जिल्हास्तर युवा महोत्सवात विविध प्रतिभावंत कलाकार, संगीत महाविद्यालय, विद्यालये, महाविद्यालये, सांस्कॄतिक मंडळे, संस्था, नवोदित कलाकार यांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्हास्तर युवा महोत्सवात आयोजित होणार्‍या बाबी खालीलप्रमाणे
अ.क्र.
कला प्रकार
सादरीकरणासाठीची वेळ मर्यादा
कलाकारांची संख्या
१.
लोकनृत्य
१५
२०
२.
लोकगीत
०७
१०
३.
एकांकिका (इंग्रजी किंवा हिंदी)
४५
१२
४.
शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी व कर्नाटकी)
१५
०२
५.
शास्त्रीय वाद्ये
अ) सितार
ब) बासरी
क) वीणा
ड) तबला
इ) मृदंगम्‍
फ) हार्मोनियम (लाईट)
ग) गिटार

१५
१५
१५
१०
१०
१०
१०

०१
०१
०१
०१
०१
०१
०१
६.
शास्त्रीय नृत्य
अ) मणिपूरी
ब) ओडीसी
क) भरतनाट्यम्‍
ड) कथ्थक
इ) कुचीपूडी

१५
१५
१५
१५
१५

०१
०१
०१
०१
०१
७.
वक्तृत्व
०४
०१
एकूण :
५७

उपरोक्त कला प्रकारामध्ये ज्यांना सादरीकरण करावयाचे आहे, त्यांनी आपली प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मल्होत्रा हाऊस, जी.पी.ओ.समोर, बोरीबंदर, मुंबई-१ (दूरध्वनी क्रमांक-०२२-२२७०२३७३) याठिकाणी संपर्क साधावा.
राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि.२७ ते ३० डिसेंबर, २०११ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा नगरी, महाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी अटी व शर्ती :

१.         युवा महोत्सवात सहभागी होणार्‍या कलाकारांचे वय १५ ते ३५ वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.
२.         नृत्य सादर करणार्‍या कलाकारांना पूर्वमुद्रित ध्वनीफितीवर कार्यक्रम सादर करता येईल.
३.         लोकनृत्य सादरीकरणासाठी कोणत्याही चित्रपटाचे गीत किंवा ध्वनीफित वापरता येणार नाही.
४.         संयोजन समितीमार्फत फक्त स्टेज, विद्युत व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येईल.
५.         रंगभूषा, वेशभूषा, वादनसामग्री, इ. व आवश्यक साहित्य कलाकारांनी स्वतः आणणे आवश्यक आहे, संयोजन समितीमार्फत कोणत्याही प्रकारचे साहित्य पुरविण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई शहर.
००००००

Comments

Popular posts from this blog