महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर.
मल्होत्रा हाऊस, तिसरा मजला, जी.पी.ओ.समोर, बोरीबंद,
मुंबई-४०० ००१.
जा.क्र.जिक्रीअ./जिल्हा.स्प.आयो./सन.२०१३-१४
दिनांक :-
२६/६/२०१३
प्रति,
मा.अध्यक्ष
/ सचिव,
प्राचार्य / प्राचार्या, मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका.
__________________________________
__________________________________
विषय: - जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत विविध
शाळांच्या सहभागा बाबत.
संदर्भ:- मा.
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, यांचे दि.४ जून २०१३ चे पत्र.
महोदय/महोदया,
उपरोक्त विषयांन्वये कळविण्यात येत आहे की, दि. २७ व २८ मे,
२०११ या कालावधीत भारतीय शालेय खेळ महासंघाची सन २०११-१२ या वर्षाची सर्वसाधारण
तसेच एक्झीकेटीव्ह कमेटीची सभा पणजी (गोवा) येथे आयोजित करण्यात आलेली होती. सदर
सभेच्या इतिवृत्तामधील मुद्दा क्र. ३६ नुसार सी.बी.एस.ई. बोर्डाला भारतीय शालेय
खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये स्वतंत्र राज्याचा
दर्जा देण्यात आलेला आहे.
भारतीय शालेय खेळ महासंघा मार्फत आयोजीत राष्ट्रीय
स्पर्धेमध्ये पुर्वी १. नवोदय विद्यालय संघटन(एन.व्ही.एस.) २. केंद्रीय विद्यालय
संघटन, ३. आय.पी.एस.सी, व ४. विद्या भारती, यांना भारतीय शालेय खेळ महासंघाने
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागासाठी स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता दिलेली
असल्याने वरिल चार बोर्डाच्या शाळेमधील खेळाडू हे क्रीडा व युवक सेअवा
संचालनालयाच्या वतिने आयोजित तालुकास्तर, जिल्हास्तर, विभाग व राज्यस्तरीय शालेय
क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र नाही.
त्याच प्रमाणे सि.बी.एस.सी. बोर्डाला भारतीय शालेय खेळ
महासंघाने सन २०१२-१३ या वर्षा पासुन स्वतंत्र विभाग (राज्य) म्हणून मान्यता
दिलेली असुन सन २०१२-१३ या वर्षी त्यांचे संघ व खेळाडू सी.बी.एस.सी बोर्डा मार्फत
स्वतंत्र विभाग (राज्य ) म्हणून सहभागी झालेले आहेत.
त्यामुळे सन २०१२-१३ या वर्षात सी.बी.एस.सी बोर्डाच्या
अखत्यारीत येणा-या शाळांना व शाळांमधील खेळाडुऊना क्रीडा व युवक सेवा संचालनालया
मार्फत आयोजीत होणा-या तालुकास्तर, जिल्हास्तर, विभाग व राज्यस्तरीय शालेय क्रीडा
स्पर्धेत सहभागी होता येणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
आपली विश्वासू
( स्नेहल साळुंखे)
जिल्हा क्रीडा
अधिकारी,मुंबई शहर.
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई जिल्हा.
२. मा उपसंचालक,
क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई.
३. मा उपसंचालक,
शालेय शिक्षण, मुंबई विभाग,
मुंबई.
४. मा. शिक्षण निरीक्षक पूर्व/दक्षिण विभाग, बृह्न्मुंबई.
कृपया आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळा व
क.महाविद्यालयांना आपल्या स्तरावरुन सूचित करावे, अशी विनंती आहे.
००००००