Tuesday, 7 May 2013

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१२-१३ करीता अर्ज पाठविणे बाबत.....

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१२-१३ करीता अर्ज पाठविणे बाबत.....
 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २००२ पासून जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्‍या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता/संघटक यांचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहेत त्याकरीता जिल्ह्यातील सर्व जिल्हा व राज्यसंघटनांमार्फत गुणवंत खेळाडू,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु अत्यंत कमी अर्ज प्राप्त झाल्याने १८ मे २०१३पर्यंत मुदतवाढ देऊन पुहा अर्ज मागविण्याचा निर्णय जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीने घेतला आहे. गेल्यावर्षीपर्यंत पुरस्कारार्थिंना रु.२१००/- रोख पारितोषिक दिले जात होते. नवीन शासननिर्णायानुसार पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करून पुरस्कारार्थींना रोख रुपये १००००/- तसेच प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. हे पुरस्कार फक्त मुंबई शहर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खेळाडू, मार्गदर्शक व कार्यकर्ता यांनाच दिले जातील. सदर पुरस्काराबाबत अर्जाचा विहित नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे विनामूल्य प्राप्त होतील. तसेच पुरस्कार नियमावलीत झालेले बदल www.mahasportal.gov.in या संकेतस्थळावर १ ऑक्टोबर,२०१२ च्या शासननिर्णयात ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य  क्रीडा पुरस्कार (खेळाडू/संघटक-कार्यकर्ता), राज्य  क्रीडा साहसी पुरस्कार,एकलव्य राज्य  क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू), जिजामाता राज्य  क्रीडा पुरस्कार  जिल्हा क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीस मान्यता देण्याबाबत.. ’ या शिर्षकांतर्गत पहावयास मिळतील.
तरी उपरोक्त पुरस्कारासाठीचे अर्ज इच्छुक खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता/संघटक यांनी आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रांवर संबंधित जिल्हा संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या सही व शिक्क्यासह दि.१८ मे २०१३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, मल्होत्रा हाऊस, ३रा मजला, जी.पी.ओ. समोर, बोरीबंदर, मुंबई-०१ (दूरध्वनी क्रमांक- २२७०२३७३) येथे सादर करावेत असे आवाहन श्रीमती स्नेहल साळुंखे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी केलेले आहे .
 
जिल्हा क्रीडा अधिकारी
   मुंबई शहर 

No comments:

Post a Comment