एन.आय.एस.पतिय़ाळा प्रमाणपत्र
अभ्यासक्रमा बाबत.
राज्यातील उदयोन्मूख खेळाडुंना त्यांचे
क्रीडा कौशल्य व क्रीडागुण विकसीत करण्याची संधी उपलब्ध करुन देतायावी या
अनुषंगाने केंद्र शासनाच्या नेताजी सुभाष नॅशनल इंन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्टस,
पतियाळा , या संस्थे मार्फत विविध खेळाचे ६ आठवड्याचे अभ्यासक्रम राबविण्यात येतात.
या अभ्यासक्रमाचा
लाभ १२ वी पास असणारे खेळाडु तसेच विविध शालेय संस्थेत, महाविद्यालये, येथील क्रीडा
शिक्षक घेऊ शकतात .
या अभ्यासक्रमाचे आयोजन दिनांक १७ मे ते २६ जून २०१३ या कालावधित पतियाळा
(पंजाब), कोलकाता, गुंटुर (आंध्र प्रदेश), गांधिनगर
(गुजरात), तसेच भारतातील एकुण १० राज्यात होत असुन सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ
इच्छीत व्यक्तींनी प्रवेश अर्जा बाबत जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर,मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला, जि.पी.ओ.समोर, बोरीबंदर,
मुंबई -०१ दुरध्वनी क्र. ०२२/२२७०२३७३ येथे किंवा मो.क्र.९७३०२००६५६, येथे संपर्क
साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.
इच्छूक व्यक्तींना अभ्यासक्रमा
बाबत अधिक माहिती www.nsnis.org. या संकेत स्थळावर प्राप्त होऊ शकेल .अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज पाठविण्याची
अंतिम तारीख दि.३१ मार्च २०१३ असल्या बाबत कळविण्यात आलेले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई शहर